Courtesy: Navayan Mahajalsa

Jay Bhim Re (जय भीम रे)
Shital Sathe & Madhur Shinde04:2597 BPM2025
"जय भीम रे" is a powerful and energetic tribute to the revolutionary spirit of Dr. B.R. Ambedkar, celebrating his relentless fight against oppression and his mission to uplift humanity. Sung passionately by Madhur Milind Shinde and Shital Sathe, with impactful music by Shital Sathe and Aniket Mohite, and thought-provoking lyrics penned by Sachin Mali and Shital Sathe, this anthem ignites the fire of equality, justice, and brotherhood.
The lyrics echo the heartbeat of millions who walk the path of Babasaheb, portraying him as the backbone, teacher, guide, and fighter who broke the chains of inequality and raised the blue flag of dignity. Through every verse, the song rallies the community to stay united, fearless, and proud of their identity, reminding us that "Jay Bhim" is not just a slogan—it's an emotion living deep within the heart.
From university protests to public marches, from street banners to ringing ringtones, the song vividly paints a picture of a movement led by knowledge, courage, and compassion. With its bold beats and unshakable lyrics, "जय भीम रे" is not just music—it's a battle cry for change, equality, and the everlasting legacy of Babasaheb Ambedkar.
जे अश्या प्रकारची गाणी रचतात त्यांना आपल्यलाला काही सांगायचंय:
मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसा Account नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD,
PUNE BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@bheemgeet
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
Lyrics: Jay Bhim Re (जय भीम रे)
नडाया भीम, पुढं भिडाया भीम
हे नडाया भीम, पुढं भिडाया भीम
त्या मनूला गाडाया भीम रे
बेड्या तोडाया भीम
माणसं जोडाया भीम
काळजा काळजात जय भीम रे...
हे नडाया भीम, पुढं भिडाया भीम
त्या मनूला गाडाया भीम रे
बेड्या तोडाया भीम
माणसं जोडाया भीम
काळजा काळजात जय भीम रे ।। धृ ।।
जोजावल आम्हा भीमानं आयुष्यच देऊन दान
उंचावलं हे निळं निशाण वाटे आम्हा त्याचा अभिमान
आमची रिंगटोन भीम
आमचा बॅकबोन भीम...
आमची रिंगटोन भीम
आमचा बॅकबोन भीम
धडधडतं ह्रिदय भीम रे
आमच्या डोळ्यात भीम
आमच्या गळ्यात भीम
काळजा काळजात जय भीम रे ।। १ ।।
अन्यायाशी नाही रे सलगी
डोळ्यात बंड वाजते हलगी
विद्यापीठामधी... विद्यापीठामधी
ओठाओठमधी... ओठाओठमधी
विद्यापीठामधी ओठाओठमधी
पोस्टर बॅनर मधी माय बाप
आमच्या मोर्च्यात भीम
आमच्या चर्चात भीम...
आमच्या मोर्च्यात भीम
आमच्या चर्चात भीम
कंठा कंठात जय भीम रे
आमच्या घोषणात भीम
आमच्या भाषणात भीम
धमण्या घामण्यात जय भीम रे ।। २ ।।
आजादीचा देतोय नारा
संविधानाचा हा सरनामा
पहिला आम्ही बुद्ध पुन्हा
भीमाचा हा कारनामा...
आमचा टीचर भीम
फिलॉसॉफर भीम...
आमचा टीचर भीम
फिलॉसॉफर भीम
आमच्या लढ्याचा गाईड भीम रे
आमच्या उरात भीम
आमच्या सुरात भीम
डफा डफा वर वाजतोय भीम रे ।। ३ ।।
उधळला वैऱ्याचा डाव
झेलूनिया जिव्हारी घाव
आम्ही मेलो तरी...
आम्ही मेलो तरी
कापले गेलो तरी
मुखी नाव तुझे माय बाप...
आमचा आयडॉल भीम
आमचा आयकॉन भीम ...
आमचा आयडॉल भीम
आमचा आयकॉन भीम
आमच्या टीम चा कॅप्टन भीम रे
देतो ऑर्डर भीम
तोडतो बॉर्डर भीम
असा फायटर लीडर भीम रे
हे नडाया भीम, पुढं भिडाया भीम
त्या मनूला गाडाया भीम रे
बेड्या तोडाया भीम
माणसं जोडाया भीम
काळजा काळजात जय भीम रे
काळजा काळजात जय भीम रे
काळजा काळजात जय भीम रे
काळजा काळजात जय भीम रे ।। ३ ।।
Lyrics By: Sachin Mali & Shital Sathe
Courtesy: Navayan Mahajalsa
Comment