SR Music

Bhimala Salami (भिमाला सलामी)
Rahul SatheBhimala Salami Marathi Bheemgeet by Rahul Sathe, Lyrics by Sunil Khare, Composed by Master Saleemji
Lyrics: Bhimala Salami (भिमाला सलामी)
जर स्वतःचा विचार केला असता, तर गावागावात बंगला बांधुन घेतला असता,
जर धनाची आशा केली असती भिमाने,
तर तिजोरीत पैसा घावला नसता, समाज क्रांती सोडून,
सुनिल जर धनाला हात लावला असता,
तर माझ्या भिमान सोन्याची टाय अन् सोन्याचा कोट शिवला असता.......
एकच झटला,
पेटून उठला,
माझ्या भिमा वानी नेता कुठला..2
भले भले ते पुढारी करतात भिमाला सलामी....2
भले भले ते पुढारी करतात भिमाला सलामी....2
जय जय भिम....जय जय भिम..
रूढीशी टक्कर देऊन,
आला तो एकटा धावुन, दिनदुबळयांना ताराया,
झटला उपाशी राहून,
ऊन पाऊस आणि वारा
केली न त्याने परवा,
मायेने पंखाखाली घेतले हो त्याने सर्वा ,
एकटाच राबला दिन रात जागला, हक्कासाठी रणात झुंजला,
जन्म जयाने लावला या दलितांच्या कामी,
भले भले ते पुढारी करतात भिमाला सलामी....2
भले भले ते पुढारी करतात भिमाला सलामी....।।1।।
कुणीच नसताना संग,
केली रुढीशी ती जंग,
क्रांती भीमाची पाहून,
भलेभले झाले दंग,
टपटप गाळून घाम,
केल भीमान काम,
जातीवादी सारे एकट्याने केले ती जाम,
कधी न हरला ?? वाघावानी सदैव फिरला
भिमान घालवली ती सारी रुढीची गुलामी
भले भले ते पुढारी करतात भिमाला सलामी....2
भले भले ते पुढारी करतात भिमाला सलामी....।।2।।
कित्येक झालेे पुढारी ते,
लाखोंनी नामधारी ते,
सारे पुढार्यांना माझे भिमराव एकटेच भारी ते,
माय पित्याच्या वानी लावून गेले माया,
दिनदुबळे म्हणती बाप आमुचा भिमराया,
सुनिल वानि लिहितात गाणी, रिहूल गायी गोड मुखानी,
बुध्द विहारी रोज म्हणतो पंचशीला मी,
भले भले ते पुढारी करतात भिमाला सलामी....।।3।।
भले भले ते पुढारी करतात भिमाला सलामी.......
Lyrics by: Sunil Khare
SR Music
Comment