T-Series

Jivanat Aamchya Tu Re (जीवनात आमुच्या तु रे)
Suresh WadkarJivanat Aamchya Tu Re marathi classical bheemgeet by Suresh Wadkar, Music by Lalit Sen, lyrics by Ramesh Thete
Lyrics: Jivanat Aamchya Tu Re (जीवनात आमुच्या तु रे)
जीवनात आमुच्या तु रे लावियला दीप....2
भिमा तुझे दिव्यत्वाचे अलौकीक रुप,
जीवनात आमुच्या तु रे लावियला दीप.
काट्याकुट्यातुन आम्ही, चाललोय युगात,
तुझ्या एक स्पर्शाने रे आणिले फुलात,
पुसूनी टाकीला सक्षणी तु...2 कलंकीत शाप,
जीवनात आमुच्या तु रे लावियला दीप।।1।।
अशिक्षित बांधव होता,
जणू आंधळा रे,
तुच ज्ञान सूर्या सारे,
तमनी वारीले रे...2
जन्मसिध्द हक्क जीन्याचा...2 मिळे आपोआप,
जीवनात आमुच्या तु रे लावियला दीप।।2।।
दृष्ठ क्रूर धर्मांधानी रुढी निर्मिल्या ज्या,
वाचविला त्यातून माणूस,
तुच भिमराजा...2
तूच आता दैवत...2
आमुचे तुच मायबाप,
जीवनात आमुच्या तु रे लावियला दीप।।3।।
भिमा तुझे दिव्यत्वाचे अलौकीक रुप,
जीवनात आमुच्या तु रे लावियला दीप.
Rap Lyrics By: Ramesh Thete
T-Series
Comment