℗ Super Cassettes Industries Limited

Kalya Ramacha Darwaja (काळ्यारामाचा दरवाजा)
Adarsh Shinde07:56170 BPM2023
Ughadlach Nahi Kalya ramacha Darwaja Marathi Bheemgeet by Adarsh Shinde Lyrics by Vaman Dada Kardak, Composed By Harshad Shinde
Lyrics: Kalya Ramacha Darwaja (काळ्यारामाचा दरवाजा)
गोदातीरी पडला जरी,
लडला सैनिक माझा,
गोदातीरी पडला जरी,
लडला सैनिक माझा,
उघडलाच नही काळ्यारामाचा दरवाजा,
उघडलाच नही काळ्यारामाचा दरवाजा ।।
गोदातीरी पडला जरी,
लडला सैनिक माझा...2
उघडलाच नही काळ्यारामाचा दरवाजा...2
कानाची कवाडे इथली उघडलीच नाही,
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही...2
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही,
आघाडीवर होता जरी नऊकोटीचा राजा...2
उघडलाच नही काळ्यारामाचा दरवाजा...।।1।।
माणसास पाणी पाजा माणसास पाणी,
नीनादात्त होती सारी भीमाचीच वाणी...2
नीनादात्त होती सारी भीमाचीच वाणी,
इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा...2
उघडलाच नही काळ्यारामाचा दरवाजा...।।2।।
दार उघड रामा आता दार उघड रामा,
पंढरीचा चौथा मेळा आला तुझ्या धामा...2
पंढरीचा चौथा मेळा आला तुझ्या धामा,
दर्शनाची संधी भीम मागत होता माझा...2
उघडलाच नही काळ्यारामाचा दरवाजा...।।3।।
सर्वांच्या होता पुढे कर्मवीर दादा,
काठ्यांचा मार खाणार होता आमचा दादा...2
काठ्यांचा मार खाणार होता आमचा दादा,
जयघोष जय भीमाचा झाला गाजावाजा...2
उघडलाच नही काळ्यारामाचा दरवाजा...।।4।।
राम दाखवा रे तुमचा राम दाखवा रे,
वामनला त्याची थोडी चवे चाखवा रे...2
वामनला त्याची थोडी चवे चाखवा रे,
बोलले पुजारी आता धेडग्यांनो जा जा...2
उघडलाच नही काळ्यारामाचा दरवाजा...।।5।।
गोदातीरी पडला जरी,
लडला सैनिक माझा...2
उघडलाच नही काळ्यारामाचा दरवाजा......
Lyrics By: Vaman Dada Kardak
℗ Super Cassettes Industries Limited
Comment