Aale Jagi Bhimraya, Are Sagara, Bhimrayavani Pudhari Hoil Ka?, Dandashi Dand Bhidtana, Jari Jhala Barister, Majhya Jatich Jatich, Nilya Nishana Khali, Saha December Dusht Kalane, Samaaj Viknaar Nahi, Soniyachi Ugavali Sakaal

Saha December Dusht Kalane (सहा डिसेंबर दुष्ट काळाने)

"Saha December Dusht Kalane" is an emotional and heartfelt tribute sung by Milind Shinde, composed by Pralhad Shinde, with poignant lyrics penned by Kalenand Kumbefalkar. The song mourns the passing of Dr. Babasaheb Ambedkar on 6th December 1956, portraying that dark day when time itself seemed to conspire to extinguish the flame of a revolutionary leader. Through moving verses, it expresses the profound grief felt across the nation and the irreparable loss of the man who gave voice and rights to millions. The track reflects on Babasaheb’s legacy, his fight against injustice, and his gift of Buddha's Dhamma, inspiring generations to carry forward his mission of equality, justice, and enlightenment. With the recurring chant "Buddham Sharanam Gachhami", the song becomes not only a remembrance but also a call to uphold the values he lived and sacrificed for.

Lyrics: Saha December Dusht Kalane (सहा डिसेंबर दुष्ट काळाने)

सहा डिसेंबर छप्पन साली वेळ कशी ती हेरली
दुष्ट काळाने भीमरायांची प्राण ज्योत ती चोरली ~~ २
बुद्धं शरणं गच्छामि, धम्म शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि ।। धृ ।।

टपून बसला होता काळ कसा महापुरुषावरती
देशो देशी वार्ता पसरता हादरून गेली ही धरती
काळजातली हंस हरपला दर्याला आली भरती
सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झुरती
प्रगतीचे ते युगे दिनाची
प्रगतीचे ते युगे दिनाची गुपित मागे सारली
दुष्ट काळाने भीमरायांची प्राण ज्योत ती चोरली
बुद्धं शरणं गच्छामि, धम्म शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि ।। १ ।।

देशहिताच्यासाठी होऊनि गेला कायद्याची गाथा
नमून फक्त आयुष्यामध्ये बुद्धाचरानी तो माथा
हरपली आई हरपली माई हरपली मात अन पिता
वाली देशाचा निघून गेला कोण होईल तैसा आता?
वैरीण राती ची ती मर्जी
वैरीण राती ची ती मर्जी धुरंदरा वरती फिरली
दुष्ट काळाने भीमरायांची प्राण ज्योत ती चोरली
बुद्धं शरणं गच्छामि, धम्म शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि ।। २ ।।

सातकोटीचा प्रकाश गेला झाली जीवाची लाही
भीमापाठी या जगात आता वाली उरलेला नाही
असे म्हणून दलित सारे रडू लागे धाही धाही
चैत्यभूमीच्या ठिकाणी अश्रूं गंगे सवे नयनी वाही
असून कोटी पिले तरीही
असून कोटी पिले तरीही भीम मूर्तीना तारली
दुष्ट काळाने भीमरायांची प्राण ज्योत ती चोरली
बुद्धं शरणं गच्छामि, धम्म शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि ।। ३ ।।

हर्ष कोपले सुख लोपले बाळाचे अन आईचे
थोर उपकार देशावरती आहे भीमाच्या शाहिचे
महामानवाने ते केले कृत्य असे नवलाईचे
बुद्ध धम्माचे रोप लावूनी फुले उमलली जाईचे
लढा देउनी गुलामगिरीला
लढा देउनी गुलामगिरीला अंधश्रध्दा ती मारली
दुष्ट काळाने भीमरायांची प्राण ज्योत ती चोरली
बुद्धं शरणं गच्छामि, धम्म शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि ।। ४ ।।

शान जळता भारतभूची चितेवरती पहिली
पाहताक्षणी कलेनंदानी श्रद्धांजली वाहिली
डबडबल्या अश्रूंनीही महिमा त्यांची गायीली
अमर झाली भीमाची कीर्ती डोळ्यांने मी पहिली
जात जात हृदयी आमच्या
जात जात हृदयी आमच्या मूर्ती बुद्धाची कोरली
दुष्ट काळाने भीमरायांची प्राण ज्योत ती चोरली
बुद्धं शरणं गच्छामि, धम्म शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि
सहा डिसेंबर छप्पन साली वेळ कशी ती हेरली
दुष्ट काळाने भीमरायांची प्राण ज्योत ती चोरली ~~ २
बुद्धं शरणं गच्छामि, धम्म शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि ।। ५ ।।

Lyrics by: Kalenand Kumbefalkar


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *