Gopala Gopala Rap (गोपाळा गोपाळा)

"Gopala Gopala Rap" is a groundbreaking Marathi rap song presented by Raptoli that combines the energy of modern music with profound social and spiritual messages. Written and composed by Vipin Tatad, the song is a tribute to the teachings of Sant Gadge Baba, promoting the values of rational thinking, education, and humanity while challenging superstitions and societal inequalities. The powerful lyrics emphasize that true divinity lies in our actions, relationships, and service to others rather than in rituals or idol worship.

The song features dynamic vocals by Gajanan Ketkar, Kartik Hirulkar, and Swarashri Ketkar, whose performances add emotional depth and intensity to the thought-provoking verses. The composition, skillfully mixed and mastered by Sagar Agale, blends traditional and modern elements, with the classical touch of Pakhavaj by Vishal Pande, creating a unique soundscape that resonates with audiences across generations.

The visuals and artwork, crafted by Prajakta Kendare with calligraphy by Bhushan Sardar, enhance the song's cultural and thematic essence. "Gopala Gopala Rap" carries a strong message, encouraging listeners to reject blind faith, embrace rationality, and serve humanity. It highlights the teachings of Sant Gadge Baba, who advocated for cleanliness, education, and equality, urging society to focus on progress and compassion.

This rap is more than music—it is a call for action, inspiring people to think critically, overcome outdated beliefs, and create a better future. Its engaging rhythm and profound message make it a cultural anthem that bridges tradition and modernity.

https://youtu.be/AdCXEJDlLfo

Lyrics: Gopala Gopala Rap (गोपाळा गोपाळा)

गोपाळा गोपाळा गोपाळा ...
गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा ~~ २
गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा ~~ २

हा गोपाळा गोपाळा ऎक जरा बाळा
गाडगेबाबा म्हणते  ऎक जरा थोडा
कर्मकांड, अंधश्रदा सारं ढोंग
देव दगडात नाही, देव माणसात बघा
शिका शिका पोरं लय लय शिका
चोरी करू नका,
कर्ज काढू नका,
व्यसनाच्या आहारी जाऊ नका,
देव धर्माच्या नावाखाली प्राणांची हत्या
जातीभेद, भेदभाव करू नका
देव दगडात नाही, देव आई बाप हाय,
माणसात हाय अन तुझ्यात नि हाय,
मातीत नि हाय, शेतकऱ्यात नि हाय
देव धर्माच्या नावाखाली ढोंग करे ढोंगी
ह्या ढोंगी पासून जरा तू दूर ऱ्हाय
शिकला तरीबी लेका पिकला नाई  
ढोंग आहेत कि science ते दिसलं नाई  
किती पूजाला देव तरीबी पावला नाई
कुठे ऱ्हायते रे त्यो मले दवला नाई
पाय मंदीरा समोर लुटली रे इज्जत
पायत बसला पण आला नाई
हातात नि त्याच्या हाय धार धार शस्त्र
मदतीला तरीबी तो धावला नाई
शेतकरी ढगाले पायते रोज रोज,
हरी हरी केला पाऊस आलाच नाई
पाप पुण्याचा हिसोब करते देव
मले हिसोब अजून लेका दवला नाई
किती पूजाला देव तरीबी पावला नाई
कुठे ऱ्हायते रे त्यो मले दवला नाई
गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा ~~ २
गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा ~~ २ ।। १ ।।

हा देबूजी झिंगराजी जानोरकर
संत गाडगे बाबा म्हणून होती ओळख
तेवीस फेब्रुवारी अठराशे श्याहत्तर
अमरावती जिल्हा, चंद्रपूर तालुका
जन्म झाला शेंड गावात
समाज सुधारक कीर्तनकार संत
प्रवासी शिक्षक, फाटलेली चप्पल
डोक्यावर वाटी अन स्वच्छता धर्म
गाव गावात केल्या गटरी साफ
करे रस्ते साफ स्वच्छताची सुरवात  
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बांधल्या शाळा
रुग्णालय, वसतिगृह, धर्मशाळा
कीर्तनाने कारे समाज प्रबोधन
अंधश्रद्धेला दिला हो फटकारा
दया, करूना, समतेचा संदेश
बंधुता, मानव कल्याणाचा संदेश
बाबासाहेबाचें विचार त्यांना पटे
संत तुकडादास सोबतीला उभे
भुकेलेल्याला अन्न, तहानलेल्याला पणी
उघड्याना वस्त्र, मदत करा तुम्ही
शिक्षणासाठी गरिबांला  मदत,
अपंगांसाठी रोगील उपचारी मदत
पशु पक्षी मुक्या प्राण्यांना प्रेम करा
बेकारांना रोजगार आणि गरिबांला मदत
अरे शिकले सावरले तुम्ही मोठ्याला लोकं
देव नाय देव हे मी सांगताना मेलो
देव दगडात नाय देव माणसात हाय
अरे सुधारायचं सोडा तुम्ही मलेचं देव केलं
गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा ~~ २
गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा ~~ २ ।। २ ।।

शिकल्या हाय शिकले तरीबी काय कामाचे
भेकाडे, फुकटचे तुम्ही सल्ले हाय मनाचे
मांजर आडवी गेली बापरे बाप
तुमच्या हातातले रेषा तो चंद्र पाप
चंद्र, तारे, सूर्य ग्रह भविष्य आत
तुमच्या नावाची लोकसंख्या करोडो पार
एक राशी अशी कशी सारे सारखे कांड
देवी देवता येते तुमच्या अंगामधी
आणि गर-गर घुमता ना नागवानी  
मग तन फन करताना भुतावनी
महापुरुष का येत नाही अंगामधी
नजर लागते कारे हिम बाळा चेहेऱ्याले
काळे पिवळे धागे तुमच्या हाताले पायाले
हाथ जोडून म्हणते मले पास कर देवा
हाव खाली येऊन देव तुया पेपर लिहून देल का  
एकशे एक नारळ ने भागत नाय आता
असं कसं करतं रे मॅड खोपडीच्या
श्रद्धा ठेव पण अंधश्रद्धा नाको
देवाऱ्यात भरते पुजाऱ्याचे पोट
एक दोन मंत्र नी तीन चार घोट
मग स्वर्ग नर्क तुले दिसेना रोज
चांद्रायणले बी बांधता लिंबू मिरची
वारे वा भली मस्त कीर्ती
बाबालोक इथे कसे करती मस्ती
साधे भोळे लोकं इथे फसती रोजची
छापला पैसा कसे करोडोंनी प्रॉपर्टी
बाबा ढोंगी पहा कसे सडत हाय जेलात नी
घुसलेकि त्याच्यात जाय मरती तर आरामशी
येलपाडे पण करू नको येथे फुकटची
व्हाट्सअँप मेसेज पाठवतीन लोकायले सटकन
नाय केलंय तर तुमची माय मरेन पटकन
बाय किती सल्ले विचारा ह्याचे लक्षण
भेटला कधीतरी देतो गालावर गचकन
शहरातला रॅपर पण भाजनांत न ग्यान देतो
निसर्गाचा रूप मी सत्याचा भाग घेतो
गाडगे बाबाचा मी लय मोठा फॅन होतो
भजनामदन नवा युगाचा आवाज होतो
झंगणंगचक कसा रॅप कसा म्हणतो
चमत्कार नाही सारं, प्रॅक्टिकल बोलतो
सायंटिफिक सायंस हे खरं हाय कारण
सारं निसर्गाने बनले निसर्गाले मानतो  
जनमाले आला तर मरण हाय निश्चित
लोकं म्हणे सारे मले देव कुठे भेटतील
देव तुये आसपास इथेच हाय भाव
माय बापाची सेवा कर तुले देव इथे भेटतील  
गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा ~~ २
गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा ~~ २ ।। ३ ।।

गोपाळ........
झंगणंगचक कसा रॅप कसा म्हणतो
चमत्कार नाही सारं, प्रॅक्टिकल बोलतो
सायंटिफिक सायंस हे खरं हाय कारण
सारं निसर्गाने बनले निसर्गाले मानतो  
जनमाले आला तर मरण हाय निश्चित
लोकं म्हणे सारे मले देव कुठे भेटतील
देव तुये आसपास इथेच हाय भाव
माय बापाची सेवा कर तुले देव इथे भेटतील.

Lyrics By: Vipin Tatad


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *