Jeevala Jivach Daan | Pani Chawdar Talyache | Tujhya Veena Rama | Deuniya lalkari lalkari

Shram Majhe (श्रम माझे )

The song "Shram Majhe (श्रम माझे )" from the album "Jeevala Jivach Daan" sung by Sonu Nigam, composed by Nikhil Vinay, and written by Prabhakar Pokharikar, is a tribute to Babasaheb Ambedkar and his teachings. It portrays Babasaheb as a guiding light for his followers, urging them to remember his contributions and spread the essence of Buddha's Dhamma (Buddhist teachings) that he has bestowed upon them.

The lyrics of the song emphasize the significance of Babasaheb's efforts in establishing social equality and providing rights to all individuals regardless of their caste or religion. They highlight the tireless dedication of Babasaheb, who never rested throughout his life, working relentlessly for the welfare and happiness of the Bahujans (masses).

The song inspires listeners to take inspiration from Babasaheb's philosophy and work towards creating a just and peaceful society. It calls upon individuals to embrace the principles of righteousness, equality, and compassion, and to actively engage in spreading the teachings of Buddha's Dhamma to uplift the lives of others.

Through its powerful lyrics and Sonu Nigam's soulful rendition, the song serves as a reminder of Babasaheb's transformative movement and encourages people to carry forward his legacy. It aims to inspire individuals to reflect upon the present state of society and strive for social transformation guided by the principles of peace, justice, and equality.

Overall, "श्रम माझे" (Shram Majhe) pays homage to Babasaheb Ambedkar and his monumental contributions, urging listeners to remember his teachings and be inspired to create a better future for all.

Lyrics: Shram Majhe (श्रम माझे )

या महामानवान भारत मातेवर आतोनात जीवापल्याड प्रेम केल. लोकशाही द्वारे या देशातल्या सर्व जाती धर्माच्या माणसांना आपले अधिकार त्यांनी प्राप्त करुन दीले. आपल्या आयुष्यात क्षण भरही आराम न घेता रात्रंदीन बहुजन हीतासाठी बहुजन सुखासाठी ते चंदनासारखे झीजले. आजची देशाची, समाजाची अवस्था पाहुन त्यांचे ज्वलंत विचार प्रेरणा देत समाजाला आव्हान करता येत. मानवाला बुद्धाची शांती हवीय रक्त क्रांती नकोय.

श्रम माझे श्रम माझे बाळांनो आठवुणी 
श्रम माझे बाळांनो आठवुणी ~~ २
हे रक्त स्वतःचे घटवुनी 
प्रचाराचे रान हे उठवुनी ~~ २
बुध्दाचा धम्म द्या पटवुनी
श्रम माझे बाळांनो आठवुणी,
हे रक्त स्वतःचे घटवुनी ।। धृ ।।

हा राग द्वेष मोहमाया नको,
अविचार असत्य मुळीच नको,
प्रज्ञा शील करुणा आचरणी,
पाप कर्म अनीती मुळीच नको,
त्रीसरण आणि ती पंचशीला ~~ २
अष्टांगिक मार्ग तो आचरुणी, 
श्रम माझे बाळांनो आठवुणी,
हे रक्त स्वतःचे घटवुनी ।। १ ।।

धर्म जाती भेद मुळीच नको,
माणसा माणसात हा वाद नको,
रक्तपात नको घातपात नको,
मानवाच्या जीवारी आघात नको,
रक्ताची ही नाती जुळवुनी ~~ २
विषमतेला त्या कटवुनी,
श्रम माझे बाळांनो आठवुणी,
हे रक्त स्वतःचे घटवुनी ।। २ ।।

मानवता खंगली भ्रांतीने,
जे दीले ते आठवा मातीने,
बुध्दाच्या सम्यक क्रांतीने,
क्रांती ही घडवा शांतीने,
जगुया रे येथे प्रेमानी ~~ २
प्रभाकरा भारत नटवुनी
श्रम माझे बाळांनो आठवुणी,
हे रक्त स्वतःचे घटवुनी ।। ३ ।।

संघटना एकीने सांगावे,
ममतेने तुम्ही ते बांधावे,
बौधी वृक्ष फुलू त्याही पालवी,
सुख शांती जीवुनी या भावी, 
बुद्ध, कबीर, फुले त्या वीचारांनी ~~ २
अवीचारा ठेवा घटवुनी,
श्रम माझे बाळांनो आठवुणी,
हे रक्त स्वतःचे घटवुनी ।। ४ ।।

श्रम माझे बाळांनो आठवुणी,
हे रक्त स्वतःचे घटवुनी

Lyrics By: Prabhakar Pokharikar


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *