Mangavat Bharli Sabha

Mangavat Bharli Sabha (माणगावात भरली सभा)

Mangavat Bharli Sabha marathi bheemgeet by Shital Sathe, Music by Aniket Mohite, Lyrics by Sachin Mali & Shital Sathe, The story of the relationship between Shahu Maharaj and Babasaheb is seen in this song

जे अश्या प्रकारची गाणी रचतात त्यांना आपल्यलाला काही सांगायचंय:

मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसा Account नंबर देत आहोत.

Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600

NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD,
PUNE BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB

आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@bheemgeet
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी


https://youtu.be/W0LH_9spivY

Lyrics: Mangavat Bharli Sabha (माणगावात भरली सभा)

माणगांवात भरली सभा शाहू राजाच्या या कोल्हापुरात..
या सभेमधी शाहू राजा सांगतो आम्हाला

काय गं...
ऐका लोक जीss ऐका लोक जीss
मायबापा तुम्ही...धृ

अस्पृशांची गर्दी जमली सभा मंडपात काय सभा मंडपात
अन त्या लोकामधी शाहूराजा उभा दिमाखात काय गं…

परदेशातून भीम आला शाळा शिकूनी काय विद्या शिकूनी..
बॅरिस्टर होऊन आला इलायतीहून काय गं...

डोळ्याचं हे पारणं फिटलं न्याहळते बाई भीमाला न्याहळते आई...
औख मिळू दे माझं त्याला ववाळते बाई काय गं...
मायबापा ऐका लोक जीss ऐका लोक जीss
मायबापा तुम्ही...१

दहा हजाराची बसली पंगत लांबवळी गं काय जेवणावळी गं..
वाढायला शाहू राजा त्याच्या हाती पळी काय गं…

आदगोंडा पाटलाने केली सारी सोय काय केली सारी सोय..
माणगावाला शाहू-भिमाचं लागावं पाय...काय गं...

चंदा मंदा गाणं गाई स्वागताला बाई राजाच्या स्वागताला बाई…
महार पोरींच्या गाण्यान सभा सुरू होई काय सभा सुरू होई… काय गं

मायबापा ऐका लोक जीss ऐका लोक जीss
मायबापा तुम्ही...२

शाहूराजानं भीमाला फेटा बांधलायी काय फेटा बांधलाई..
हत्तीवरून साखर पेढा वाटलाई काय गं...

भीम उभा भाषणाला…कंठ दाटलायी भीमाचा कंठ दाटलाई...
डोळ्यां मधला अश्रू आज उरी पेटलाई आज उरी पेटलाई काय गं…

उपकरातून राजाच्या व्हावं उतराई कसं व्हावं उतराई..
शाहू राजाच्या जयंतीचा सण करा बाई साजरा सण करा बाई काय गं...

मायबापा ऐका लोक जीss ऐका लोक जीss
मायबापा तुम्ही...३

परिषदेच्या सांगतेला शाहू उभा राही राजा शाहू उभा राही…
शिंग तूतारी वाजे सभा दणाणून जाई काय गं...

काल पातूर तुमची मी सावतर आई होतो सावतर आई...
भीमराव आंबेडकर हीच सख्खी आई… तुमची हीच सख्खी आई काय गं...
माझा भीमराव आंबेडकर हीच सखी आई काय गं ..
मायबापा ऐका लोक जीss ऐका लोक जीss
मायबापा तुम्ही...४

Lyrics By: Sachin Mali & Shital Sathe


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *