Sari Bhimachi Punyai

Sari Bhimachi Punyai (सारी भीमाची पुण्यई)

Majha Je Je Kahi Sari Bhimachi Punyai marathi bheemgeet by Shital Sathe, Composed by Shital Sathe & Aniket Mohite, Lyrics by Sachin Mali,

जे अश्या प्रकारची गाणी रचतात त्यांना आपल्यलाला काही सांगायचंय:

मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसा Account नंबर देत आहोत.

Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600

NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD,
PUNE BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB

आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@bheemgeet
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी


https://youtu.be/DRWXo1TxEoE

Lyrics: Sari Bhimachi Punyai (सारी भीमाची पुण्यई)

डोळां सपान लिवून ओवी गातीया गं माई
माझं जे जे काई सारी भिमाची पुण्याई...

ज्ञानबंदीचा हुकूम व्हता माय बापड्याला
बांधलं सूर्याचं तोरण त्यानं माझ्या झोपड्याला
फिटला युगांचा अंधार सूर्य दिसला गं बाई
माझं जे जे काई सारी भिमाची पुण्याई...

सोडा जोहार जोहार आम्हा माणसावाणी वागवा
मानवतेची ज्योत तुमच्या हृदयात जागवा
धम्म देई भीम शरण बुद्धाला गं जाई
माझं जे जे काई सारी भिमाची पुण्याई...

भाकरीआधी स्वाभिमान पाहिजे माणसाला मान
कसल्या गावाच्या जमीनी पाहिजे हक्काचं वं रान
बंधमुक्तीसाठी वस्त्या जागल्या गं बाई
माझं जे जे काई सारी भिमाची पुण्याई...

जुलमाच्या डोलाऱ्याचं गिऱ्हाण सुटणार कधी
चोख्याच्या पायरीचा पांग फिटणार कधी
बेड्या हजारो सालांच्या खणाणल्या बाई
माझं जे जे काई सारी भिमाची पुण्याई...

Lyrics By: Sachin Mali


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *