Sanmanacha Hira

Sanmanacha Hira (सन्मानाचा हिरा)

Sanmanacha Hira marathi bheemgeet by Adarsh Shinde, Music by Keshav Khobragade, Lyrics Late Lalit Sonone

Lyrics: Sanmanacha Hira (सन्मानाचा हिरा)

भारतभूच्या मुकुटावर तु सन्मानाचा हिरा...२
बहुजनांचा कैवारी तु एक जन्माला खरा...२

भारतभूच्या मुकुटावर तु सन्मानाचा हिरा...२
बहुजनांचा कैवारी तु एक जन्माला खरा...२

कुणी निर्मिला भेदभाव हा इथे माणसातला...२
समतेचे तु शिंग फुंकीले रणात क्रांतिवीरा...२
भारतभूच्या मुकुटावर तु सन्मानाचा हिरा
बहुजनांचा कैवारी तु एक जन्माला खरा...२ || 1 ||

पिंजऱ्यात कोंडून रुढींनी बंद ज्यास ठेविले...२
नवमुक्तीचे पंख दिले तु अशा सर्व पाखरा...२
भारतभूच्या मुकुटावर तु सन्मानाचा हिरा
बहुजनांचा कैवारी तु एक जन्माला खरा...२ || 2 ||

समुद्र मंथन तु ज्ञानाचे अखंड केले असे...२
अर्पिलेस भारतमातेला घटना विद्याधरा...२
भारतभूच्या मुकुटावर तु सन्मानाचा हिरा
बहुजनांचा कैवारी तु एक जन्माला खरा...२ || 3 ||

सुगंध होऊन तव कीर्तीचा दरवळती ही फुले...२
इथला बारा तुला वंदना करीतो युगंधरा 
वंदना करीतो युगंधरा...२
भारतभूच्या मुकुटावर तु सन्मानाचा हिरा...२
बहुजनांचा कैवारी तु एक जन्माला खरा...२ || 4 ||

बहुजनांचा कैवारी तु एक जन्माला खरा.....

Lyrics By: Late Lalit Sonone


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *