laal-divyachi-gaadi-yathavakash

Laal Divyachi Gadi – Yathavkash (लाल दिव्याची गाडी)

"Laal Divyachi Gadi" is a Marathi song from the movie Yathavkash, Directed by Avinash Shembtwad and Produced by MVF Productions. The song features Lyrics, Composition, and Rap by rocKsun.

The lyrics of the song are inspired by the struggles of competitive examinees who face numerous challenges in their pursuit of success. The song shows their determination, hard work, and perseverance, as they overcome various obstacles to achieve their goals. The fusion of traditional Marathi music with modern rap elements creates a unique and catchy sound that captures the spirit of the characters and their journey.

"Laal Divyachi Gadi" is a powerful and thought-provoking song for anyone facing challenges on their journey to success.

So songs that focus on social issues target the flaws of the people as well as the system so that the people, society, and the government try to correct those flaws. this was a significant part of Babasaheb Ambedkar's work, we consider such songs as Bheemgeet. So the thought in such a song is tried to reach as many people as possible.

Audio Credits:
Lyrics & Rap:- rocKsun @THEROCKSUN
Beat Composed by: Vedang @prodbyvedang & @THEROCKSUN
Beat Producer: Vednag Deshpande ( Itihas Studio )
Mixing & Mastering: Gray Spark Studios
Recorded at Gray Spark Studios


https://youtu.be/LcKFMPBwU3k

Lyrics: Laal Divyachi Gadi - Yathavkash (लाल दिव्याची गाडी)

पानावर पडलं पान अधिकाऱ्यांच्या कहाण्या सजल्या
मुडदे पडले आमचे ह्यांनी सरणावरती भाकरी भाजल्या
हरामखोर समाज बी अख्खा मुळावर उठला आमच्या
रक्ताळ कुल्ल्यांवर क्लासेस वाल्यांच्या घुगऱ्या शिजल्या

डोळ्यातला अंगार तरी पण कमी नाही झाला
फणफणत्या स्वप्नांवर सिंयासतीचा घाला
सुरकुत्यांनी भरला माझ्या बापाचा चेहरा
घरावर तुळशीपत्र पोस्ट लागन हाताला

कारण दोनशे जागा सुटल्या आणि चार लाख फाॅर्म भरले
पुस्तकांनी खोली भरली दुःख काळजात पुरले
जागून काढल्या राती चंद्राचा सुर्य केला
झोप रातीची उडाली मेंदुचा तोल गेला

काळजावर पडल्या जखमा नाही प्रेमाचा लेप
आभाळ फाडून ठेवंल जखमी गरुडाची झेप
समुद्राच्या छाताडावर आसवांचा तांडव
वाघाच्या सामर्थ्यावर करती लांडगे आक्षेप

ऐ कट्ट्यावरच्या फुकट्यांनो थट्टा करता काय
मागं नसतो घेत मी हा टाकलेला पाय
माझी लाल दिव्याची गाडी तुमच्या दारावरून जाईल
तव्हा कळंल माझी पावर अन तुमची लायकी काय

आमचा बाप घाम नाही गाळत बाबा रक्त आटवतो
आईचा चेहरा उरात जिद्द पेटवतो
फाटक्या पायजाम्यावर गावातन फिरतं मथारं
काळं जाऊद्या थोडा बसल्या बसल्या रान उठवतो

हा अपमानाचा फटका बी आम्ही सहलाय
आम्ही सूर्याच्या डोळ्यात अंधार पाहिलाय
ही अशी आयुष्याची राख रांगोळी होऊ नाही देणार
स्वाभिमान आमचा राखतनं उभा राहिलाय

कुणी पण येता जाता द्यायला लागलं सल्ला
जव्हा यश घालंल धुडगूस तव्हा हाललं अख्खा जिल्हा
पोटाला चिमटा घेऊन जिवाचं रान केलं
एक डबा लावून दोघा मित्रांनी खाल्ला

लाल दिव्याच्या नादानं मी लायब्ररीत जवानी फुकली
क्लासेसची फी भराय बापानं अर्धी शेती विकली
दहा वर्ष घासून पण सक्सेस चा पत्ता नाय
मित्र लागले बायका मिरवाय इकडं आमची केसं पिकली

प्रेमाच्या जात्यामध्ये जीव हा भरडला
आसवांचा तिनका होऊन तुफानाला भिडला
मी पण तीच्या आठवणींना मुठ माती दिली
माझ्या काळजाचा ठोका तिने डोळ्यादेखत चिरडला

पण मैदानातनं अजीबात मी माघार नाही घेणार
डोळ्यांना आसवांचा आधार नाही देणार
माझ्या ज्ञानाची ज्योत हे अख्खं आसमान पेटवंन
माझ्या स्वप्नांचा कधी सुद्धा बाजार नाही होणार

अपयश आलं म्हणून आसवं ढाळण्यात वेळ नाही आम्हाला
परीस्थितीच्या उरावर पाय ठेवून ती बदलण्याची ताकद ठेवतो 

Lyrics By: RockSUn


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *