Jeevala Jivach Daan | Pani Chawdar Talyache | Tujhya Veena Rama | Deuniya lalkari lalkari

He Pani Anile Me (हे पाणी आणीले मी)

The emotional song "He Pani Anile Me (हे पाणी आणीले मी)" is a part of the album "Jeevala Jivach Daan." It is beautifully sung by Sonu Nigam, with heartfelt lyrics written by Prabhakar Pokharikar. The composition of the song is done by Nikhil Vinay.

The lyrics of the song depict a poignant incident involving. On a particular day, from morning till afternoon, a motorcade accompanied Dr. Babasaheb Ambedkar, speeding through the streets of Panvel. Due to the scorching heat, Dr. Ambedkar felt extremely thirsty, so the driver stopped the car near a hotel. The hotel owner refused to give water to Dr. Ambedkar and his associates, stating that he wouldn't provide water to a Mahar barrister. These words reached the ears of Sonba, a woodcutter by profession. He immediately ran home, filled a pot with clean water, and rushed back. However, by the time he reached, Dr. Ambedkar's motorcade had already left. Sonba realized that he should never let such a situation arise again. From that moment onwards, he vowed to stand by the roadside with a pot of water until his last breath, waiting for Dr. Ambedkar to pass by and offer him water.

Overall, "He Pani Anile Me (हे पाणी आणीले मी)" is a moving composition that portrays the unwavering spirit and sacrifices made by individuals in their support of Dr. Babasaheb Ambedkar. It serves as a tribute to his struggles and his vision for equality and social justice.

Lyrics: He Pani Anile Me (हे पाणी आणीले मी)

एके दीवशी भरदुपारी पनवेल च्या नाक्यावरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मोटार भर वेगात चालली होती. बाबासाहेबांना खुप तहान लागली म्हणून ड्रायव्हरन जलळच्या हॉटेलसमोर गाडी थांबवली बाबासाहेबांच्या समवेत असलेले त्यांचे सहकारी गडकरी पाणी आणायला गेले बँरिस्टर आंबेडकरांना पाणी हवय हॉटेलच्या मालकान साफ नकार दीला हॉटेलमालक उद्गारला, महार बॅरिस्टरला पाणी मुळीच देणार नाही, हे शब्द सोनबा येलवे नावाच्या लाकुड तोडणा-या माणसान ऐकले. धावत पळत तो घरी गेला स्वच्छ पाण्यान माट भरुन आणला पण तेवढ्यात बाबासाहेबांची मोटार भर वेगान निघून गेली बाबासाहेब पुन्हा या वाटेन येतील ते तसेच जाऊ नये म्हणून आयुष्यभर त्या वाटेवर पाण्याचा माट भरुन सोनबा वाट पाहत उभा राहीला तो संपला शेवटच्या श्वासापर्यंत तो बोलत होता.

हे पाणी आणीले मी,
हे पाणी आणीले मी,
माट भरुनी हे घोटभर जाह पिऊनी,
हे पाणी आणीले मी माट भरुनी
हे घोटभर जाह पिऊनी
हे पाणी आणीले मी ।। धृ ।।

नव्हे माणस सारीच शैतान ही,
भीम बाबा यांना नाही मुळी जाणही ~~२
हे मोठ्या श्रद्धेने
हे मोठ्या श्रद्धेने आलो मी घेऊनी
हे घोटभर जाह पिऊनी,
हे पाणी आणीले मी माट भरुनी हे घोटभर जाह पिऊनी ।। १ ।।

भर उन्हात व्याकूळ जीव थांबला,
शब्द कर्मठांचा झीवारी तो झोंंबला ~~२
तो दाही दिशा पाही
तो दाही दिशा पाही टक लावुनी
हे घोटभर जाह पिऊनी,
हे पाणी आणीले मी माट भरुनी हे घोटभर जाह पिऊनी ।। २ ।।

जीव जीवात हा होता त्याच्या जोवर
पाणी घेऊनी वाट पाहीली तोवर ~~२
तो प्राण सोडीला
तो प्राण सोडीला बाबा म्हणूनी
हे घोटभर जाह पिऊनी,
हे पाणी आणीले मी माट भरुनी हे घोटभर जाह पिऊनी ।। ३ ।।

बोले सोनबा भीम बाबा येतील,
पाणी घोटभर माझ्या हाती घेतील ~~२
तो धन्य प्रभाकरा
तो धन्य प्रभाकरा वाट पाहुनी
हे घोटभर जाह पिऊनी,
हे पाणी आणीले मी माट भरुनी हे घोटभर जाह पिऊनी ।। ४ ।।

हे पाणी आणीले मी माट भरुनी हे घोटभर जाह पिऊनी......

Lyrics By: Prabhakar Pokharikar


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *