Jeevala Jivach Daan | Pani Chawdar Talyache | Tujhya Veena Rama | Deuniya lalkari lalkari

Waat Kiti Me Pahu (वाट किती मी पाहु)

Waat Kiti Me Pahu Marathi Bheemgeet by Sonu Nigam full mp3 song, Lyrics by Prabhakar Pokharikar, Composed by Nikhil Vinay.

Lyrics: Waat Kiti Me Pahu (वाट किती मी पाहु)

सुभेदार रामजी सकपाळ डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांचे पिता ज्यांनी साणुल्या भीमाला घडविण्यासाठी रक्ताच पाणी करुन खुपखुप शिकवल. भीमराव बडोद्याचे सरकार सयाजी राव गायकवाड यांच्याकडे नोकरी करत होते. इकडे पिता रामजी बाबा शेवटची घटका मोजत होते. त्यांची अंतिम इच्छा होती भीवाला डोळे भरुन पाहण्याची भीवा, भीवा फक्त एकदाच भेट दे, फक्त एकदाच.

वाट किती मी पाहु येशील कधी भीवा
वाट किती मी पाहु येशील कधी भीवा...2
मृत्यू समोर उभा हा,
मृत्यू समोर उभा हा 
येशील कधी भीवा,
वाट किती मी पाहू येशील कधी भीवा...2

मृत्यू समोर उभा हा
मृत्यू समोर उभा हा,
येशील कधी भीवा,
वाट किती मी पाहू येशील कधी भीवा..

इच्छा मनाची या क्षणी डोळे भरुन पहावे...2
डोळे हे मीटताना भीवा सामोरी तु असावे,
वेळ नको ही लावु
वेळ नको ही लावु
होती वेदना जीवा,
वाट किती मी पाहू येशील कधी भीवा...।।1।।

कंठात जीव आला थांबवीले मी त्याला...2
पाहण्या माझ्या बाळा लाडक्या मम भीवाला,
आयुची ज्योत संपली
आयुची ज्योत संपली
मावळेल हा दीवा,
वाट किती मी पाहू येशील कधी भीवा...।।2।।

तुझा पिता मी झालो भाग्य हे माझे थोर...2
रामजी सकपाळाची किर्ती ही गाजे भुवर,
अंतीम क्षणी प्रभाकरा
अंतीम क्षणी प्रभाकरा
आसरा तुझा हवा,
वाट किती मी पाहू येशील कधी भीवा...।।3।।

मृत्यू समोर उभा हा,
मृत्यू समोर उभा हा,
येशील कधी भीवा,
वाट किती मी पाहू येशील कधी भीवा..।

Lyrics By: Prabhakar Pokharikar


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *