℗ Ishtar Music Pvt. Ltd.

Haath Bhimane Jodile (हात भीमाने जोडीले)
Milind Shinde06:54104 BPM2023
Buddha Vina Nahi Kuna Haath Bhimane Jodile Marathi Bheemgeet by Milind Shinde Lyrics by Rajas Jadhav
Lyrics: Haath Bhimane Jodile (हात भीमाने जोडीले)
पीढ्यानं पीढ्याच्या जीर्ण रुढीच्या....2
श्रृंखलेस त्या तोडीले,
बुध्दाविना नाही कुणा हात भीमाने जोडीले....2
नागपुरीच्या दीक्षाभूमीला, धर्मांतराची सोन्याची वेळा, काक्षायी वस्त्रे अंगी तो न्याला, दिन जणांचा उध्दार झाला,
बुध्द जनांनी त्या शुभ वेळा...2
बुध्दम शरणम स्वर छेडीले,
बुध्दाविना नाही कुणा हात भीमाने जोडीले....।।1।।
वाणी बुध्दाची कानी ती आली, रात भयानक दूर पळाली, यूगायूगाची कर्मे जळाली,
मरगळ सारी निघून गेली,
बुध्द प्रबुध्दा सबुध्दाचे....2
ऋण तयाने फेडीले....
बुध्दाविना नाही कुणा हात भीमाने जोडीले....।।2।।
धम्मचक्र ते तथागथाचे,
परिवर्तन ते करण्या जगाचे,
फाडून गुरखे ढोंगी जनांचे,
दीप उजळीते हिनमनाचे,
प्रज्ञा करुणा आणि शीलाच्या....2 मनोरथाला मोडीले,
बुध्दाविना नाही कुणा हात भीमाने जोडीले....।।3।।
वर्ण विचारा जिथे न थारा,
बीज समतेचे मातीत पेरा, परंपरेचा चुकवित फेरा,
बुध्दमय करण्या भारत सारा, जीर्ण सनातन राजसा ते....2
भूत तयाने गाडले,
बुध्दाविना नाही कुणा हात भीमाने जोडीले....।।4।।
पीढ्यानं पीढ्याच्या जीर्ण रुढीच्या....2
श्रृंखलेस त्या तोडीले,
बुध्दाविना नाही कुणा हात भीमाने जोडीले......
Lyrics By: Rajas Jadhav
℗ Ishtar Music Pvt. Ltd.
Comment