Ishtar

Raatra Sarali Jhop Sampawa (रात्र सरली झोप संपवा)
Milind ShindeThe Marathi song "Raatra Sarali Jhop Sampawa" is a beautiful composition sung by Milind Shinde and written by Punjabrao Dande. The song depicts the awakening of Buddha and encourages listeners to embark on the path of spiritual enlightenment. It symbolizes the transition from darkness to light, urging individuals to rise and embrace the teachings of the Buddha. The lyrics emphasize the impermanence of worldly possessions and the significance of embracing the Three Jewels (Trisaranas) - the Buddha, the Dhamma (teachings), and the Sangha (community of followers).
Lyrics: Raatra Sarali Jhop Sampawa (रात्र सरली झोप संपवा)
रात्र सरली झोप संपवा ~~२
झाली बुद्ध पहाट
उठा बंधुनो चला धरूया त्रिसरण्याची वाट ।। धृ ।।
विस्तररिती पंख विहंग, आळस तुम्हा गोविले संग ~~ २
जीवनाचे ह्या क्षण क्षण भंगुर ~~२
नश्वर भौतिक थाट
उठा बंधुनो चला धरूया त्रिसरण्याची वाट ।। १ ।।
सरी किरणाच्या तांबूस झाल्या, जणू चिवारीवरी रंगच ल्याल्या ~~ २
वंदनेच्या घाइनेती ~~२
सजली मंगल प्रभात
उठा बंधुनो चला धरूया त्रिसरण्याची वाट ।। २ ।।
बुद्धविहारी रम्य सुगंध, पाहून मन हे होईल धुंद ~~ २
बुद्ध पूजेने येईल जीवनी ~~२
पंचशीलेची लाट
उठा बंधुनो चला धरूया त्रिसरण्याची वाट ।। ३ ।।
सम्यक दृष्टी सम्यक वाचा, कर्म जीव सम्यक साचा ~~ २
तंदेतयज्ञे स्पृदी समाधी ~~२
निर्वाणाला गात
उठा बंधुनो चला धरूया त्रिसरण्याची वाट ।। ४ ।।
रात्र सरली झोप संपवा ~~२
झाली बुद्ध पहाट
उठा बंधुनो चला धरूया त्रिसरण्याची वाट.
Lyrics By: Punjabrao Dande
Ishtar
Comment