℗ Ishtar Music Pvt. Ltd.

Shilvan Bhari Gunvan (शिलवान भारी गुणवान)
Milind ShindeShilvan Bhari Gunvan Marathi Bheemgeet by Milind Shinde Lyrics by Prabhakar Pokharikar
Lyrics: Shilvan Bhari Gunvan (शिलवान भारी गुणवान)
शिलवान भारी गुणवान,
विद्या पती जिचा धनवान..2
नटविला सोन्यान तो संसार भिमाचा रमान..2
शिलवान भारी गुणवान,
विद्या पती जिचा धनवान..2
नटविला सोन्यान तो संसार भिमाचा रमान..2
भल्या पहाटे उठुन शेणी गौर्या थापून,
राख पोळीचा वेचून पै पैका जमवून..2
श्रमान बहु श्रमान..2
नटविला सोन्यान तो संसार भिमाचा रमान....।। 1 ।।
गळी ते काळ मणी गं,
भाळी कुंकु लेवुनी,
सुख दुःखात रमा ती नित्य राही आनंदुनी..2
प्रेमान अती प्रेमान ..2
नटविला सोन्यान तो संसार भिमाचा रमान....।। 2 ।।
उच्च शिक्षणासाठी जाता, परदेशी धनी,
घरी उपाशी रमाई, झुरली धन्यासाठी मनी..2
नेमान नित्य नेमान..2
नटविला सोन्यान तो संसार भिमाचा रमान....।। 3 ।।
प्रज्ञा सूर्या भिमराया रमाईची साऊली,
प्रभाकरा दलितांची रमा ठरली माऊली..2
जोमान तिन जोमान,
जोमान लय जोमान....2
नटविला सोन्यान तो संसार भिमाचा रमान....।। 4 ।।
शिलवान भारी गुणवान,
विद्या पती जिचा धनवान..2
नटविला सोन्यान तो संसार भिमाचा रमान..........
Lyrics By: Prabhakar Pokharikar
℗ Ishtar Music Pvt. Ltd.
Comment