℗ Ishtar Music Pvt. Ltd.

Swpna Te Bhimarayache (स्वप्न ते भिमरायाचे)
Anand Shinde07:0093 BPM2023
Swpna Te Bhimarayache Marathi Bheemgeet by Anand Shinde Lyrics by Manwel Gaikwad
Lyrics: Swpna Te Bhimarayache (स्वप्न ते भिमरायाचे)
स्वप्न ते भिमरायाचे
करुया आता साकार इथे..2
एकीने एकतेचा हा ..2
मिळुनी करु प्रचार इथे.
स्वप्न ते भिमरायाचे
करुया आता साकार इथे..2
जागे व्हा आता निद्रेतुनी या, बघाया अदला ही रम्य सकाळ,
मंगल प्रभाती या भिम बागेमधल्या,
सुमनांची या गुंफुनी माळ,
ठसवा मनामना मध्ये, भिमरायाचा विचार इथे,
स्वप्न ते भिमरायाचे
करुया आता साकार इथे..।।1।।
स्वप्न अधुरे ते पूर्ण कराया,
जिद्द मनाची सिद्ध करुया, अमृतवाणी त्या पुरुषोत्तमाची, सदा सदैव सारे स्मरुया,
संघास सांगणारा..2
तो निर्माण करु अनुस्वार इथे,
स्वप्न ते भिमरायाचे
करुया आता साकार इथे..।।2।।
मतभेदाच्या गतवादीच्या श्रृंखला त्या तोडु चलारे,
पाहू नकारेे वळूनी माघे नाते प्रेमाचे जोडुन घ्या रे,
तुटलेल्या या मनास हो ..2
देऊ सारे आधार इथे,
स्वप्न ते भिमरायाचे
करुया आता साकार इथे..।।3।।
जय भिम जय भिम अमृतवाणी, निनाद आता जगती हो तुंग,
निळ्या नभाला हे निळे निशाण, भिडताच सारे होतील दंग,
समता ममता बंधुत्वाने ..2
प्रथम करु संसार इथे,
स्वप्न ते भिमरायाचे
करुया आता साकार इथे..।।4।।
एकीने एकतेचा हा ..2
मिळुनी करु प्रचार इथे.
स्वप्न ते भिमरायाचे
करुया आता साकार इथे......
Lyrics By: Manwel Gaikwad
℗ Ishtar Music Pvt. Ltd.
Comment