℗ Ishtar Music Pvt. Ltd.

Sarali Nisha (सरली निशा)
Anand Shinde & Milind ShindeSarali Nisha Hasali Usha Marathi Bheemgeet by Milind Shinde Lyrics by Deepshaam Mangalvedhekar
Lyrics: Sarali Nisha (सरली निशा)
सरली निशा,
हसली उषा,
आनंदल्या दाही दिशा...2
देणगी मिळाली मानवा,
उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा...2
धन्य ती माता भिमाई,
पोटी आला रामजीचा लाल,
चौदा एप्रिल या दिनी,
समतेचा झाला उषःकाल...2
रखरखत्या उन्हामध्ये ९१ सनामध्ये...2
तैतामध्ये गारवा,
उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा...।।1।।
भारतभूमीचा सुपूत्र,
जन्मला या मंगलदिनी,
फुलोरा फुलूनी आला,
दलितांच्या घरी अंगणी...2
निळ्या नभी निळा नवा लाखामध्ये एक दिवा...2
शितल जणू चांदवा,
उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा...।।2।।
महू गाव सारे नाचले,
उधळीत सप्तरंग,
हर्षाने भरुनी आले दुबळ्यांचे अंतरंग...2
धन्य धन्य हा जन्म
सार्थक हे दिपशाम...2
जीवा लागे या गोडवा
उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा...।।3।।
सरली निशा,
हसली उषा,
आनंदल्या दाही दिशा...2
देणगी मिळाली मानवा,
उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा.
Lyrics By: Deepshaam Mangalvedhekar
℗ Ishtar Music Pvt. Ltd.
Comment