
Aika Bhimarayachi Katha (ऐका भीमरायाची कथा)
Pralhad ShindeAika Bhimarayachi Katha Marathi Bheemgeet by Pralhad Shinde
Lyrics: Aika Bhimarayachi Katha (ऐका भीमरायाची कथा)
ही आहे खरी व्यथा
ध्यानी देऊनी आता
ऐका भीमरायाची
स्फूर्ती मय कथा
ही ऐका भीमरायाची
स्फूर्ती मय कथा...2
पहा अठराशे एक्यान्नव साली, चौदा एप्रिल धन्य ती झाली,
शुभ संदेश हा घेऊन आली, जन्मास दीनांचा वाली,
महु गावाचे सोने झाले हो,
हर्ष कीरणात सारे न्याहले हो, चौदावे रत्न हे भीमाइचे,
कौतुक करीती भीमबाळाचे,
रुप ते तेजस्वी पाहून त्याचे,
आठवले बोल ते वैराग्याचे,
मन हे बोले रामजी पीत्याचे,
नाव उज्वल करील कुळाचे,
खेळू लागला भीवा अंगणात, मावेना हर्ष त्यांचा गगणात,
गुण पाहुनी भीम बाळाचे,
हर्षले मन ते भिमाईचे,
आता हा सुखी झाला संसार, मनात नाही दुजा विचार,
सुख दोघेही पाहू लागले,
गुण बाळाचे गाऊ लागले,
धन्य ती भीम माता,
धन्य रामजी पीता,
धन्य रामजी पीता,
ही ऐका भीमरायाची
स्फूर्ती मय कथा...।।1।।
बालपणी ते चटके दुःखाचे,
मुख पाहिले नाही सुखाचे,
दहाव्या वर्षी प्रचीती आली, भीमास भिमाई सोडून गेली,
प्रेमळ आत्या मीराबाईने,
केला सांभाळ अतिप्रेमाने,
शाळेचा सुरु झाला सहवास,
त्यात जातीयतेचा आभ्यास,
असा विषमतेचा हा काळ,
पाहात होता डोळ्याने बाळ,
कोवळे वय हे कळेना काही,
परी मनाला त्या छळत राही, शाळेत घडला ऐसा प्रसंग,
प्रसंगात? केला या संघ,
मनात पेटू लागली आग,
जीर्ण रुढींचा आला लय राग, केला निश्चिय त्या कोवळ्या बुद्धीने,
करीन शिक्षण ते जिद्दीने,
जिद्द त्याने ती केली सिद्ध,
करण्या अन्यायाशी ते युद्ध,
नाही मिळणार काही शांतीने, मिळेल सारे ज्ञान क्रांतीने, लेखणीची घेऊनी तलवार, निघाला रनी भीम सरदार, अत्याचार पाहता,
क्रोध अंगी जागता,
क्रोध अंगी जागता,
ही ऐका भीमरायाची
स्फूर्ती मय कथा...।।2।।
ऐका महाडाचा तो इतिहास,
प्रेरणा देई भीम कार्यास,
प्रथम हे स्फूर्ती स्थान भीमाचे, दीपवी डोळे सारे विश्वाचे,
केला चवदार तळ्याला स्पर्श, नीळ्या नभाला भिडला तो हर्ष, सत्याग्रह तो यशस्वी ठरला,
यश पाहून वैरी घाबरला,
मानवी हक्काचा हा संग्राम,
मनी विचार हा केला ठाम,
लाविले गुलामीला ग्रहण, मनुस्मृतीचे केले दहण,
आता हे मन रहीना शांत,
प्रवेश हवा त्या मंदिरात,
डोळे आतुरले सत्याग्रहाचे,
दर्शन घेण्या काळ्यारामाचे, जातीयतेच्या या लढाईत, भीमराया होता पटाईत,
प्रवेश मंदिरात मिळवीला,
इथे ही भीमाचा वीजय झाला, आता समाजाला आली जाग, धाऊ लागले भीमाच्या माघ, भीमकार्याची धरुनी जाण,
घेतीले तळहातावरी प्राण,
पुणे करार बोलु लागला,
सारा समाज डोलु लागला, भीमाची एक सही महान,
वाचवी गांधीजींचा तो प्राण,
कीर्ती जगी गाजता,
वरुन कीती धन्यता
वरुन कीती धन्यता,
ही ऐका भीमरायाची
स्फूर्ती मय कथा...।।3।।
शिक्षित व्हाव संघटीत व्हाव, संघर्षान जग हे जिंकाव,
असा संदेश भीमाचा थोर,
आहे जीवंत आपुल्या समोर,
देश परदेशी भीम जाऊन,
अनेक पदव्या आल्या घेऊन, लाखात एक शोभला फार,
असा विद्येचा खरा डॉक्टर,
दर्शवी तेज आपल्या ज्ञानाचे, स्थान मीळवीले सदा मानाचे,
मने विरोधकांची लाजवली, गोलमेज परिषद गाजवली,
विचार करुनी अतिखोल, अनुभवाचे बोलती बोल,
येवला गावी गर्जना दिली, धर्मांतराची घोषणा केली,
सन हे 1956 साली,
बुध्द धम्माची दीक्षा दीली,
दीला निर्जीवांना आधार,
सा-या जनतेचा केला उद्धार,
प्रथम ही विद्वता,
सांगे जगा सत्यता
सांगे जगा सत्यता
ही ऐका भीमरायाची
स्फूर्ती मय कथा...।।4।।
Comment