Ishtar

Buddh Pranali (बुद्ध प्रणाली)
Anand ShindeThe Marathi song "Buddh Pranali (बुद्ध प्रणाली)" is sung by Anand Shinde with lyrics by Dilraj Pawar. It conveys the teachings and principles of Gautam Buddha, emphasizing peace, harmony, and equality for the welfare of humanity.
The song inspires listeners to embrace non-violence, compassion, and understanding while urging them to break the cycle of violence. It promotes values such as love, tranquility, and unity, encouraging individuals to protect and value all living beings.
The lyrics mention historical figures and cities associated with Buddha's teachings, highlighting the transformative power of his wisdom. Overall, the song, sung by Anand Shinde and with lyrics by Dilraj Pawar, serves as a reminder to embrace a way of life that promotes peace, compassion, and the well-being of all.
Lyrics: Buddh Pranali (बुद्ध प्रणाली)
बुद्धाची ती बुद्ध प्रणाली ~~ २
निनादे शांती समतेची
धरली वाणी तथागताची जीवनी मानव हिताची ।। धृ ।।
रोहिणी नदी साठी तुम्ही रक्त का सांडता
अप्सा मध्ये वैर करून भाऊ भाऊ भांडता
खुले असुनी पाणी नदीचे मुडदे का पाडता
युद्धानेच युद्ध वाढे का उगा भांडता
तोडू नका हो शाक्यकोलीया ~~ २
ही नाती रक्ताची
धरली वाणी तथागताची जीवनी मानव हिताची ।। १ ।।
दिवसा चोरी आणि लबाडी सोडावी मानवा
निरपराधी प्राण्यांचे जीव ते वाचवा
क्रोधानेच क्रोध वाढे कोडे हे सोडावा
मानवतेचे नाते जोडा माणुसकी वाढवा
समता ममता नांदावी शांती ~~ २
जगती एका मताची
धरली वाणी तथागताची जीवनी मानव हिताची ।। २ ।।
बुद्ध वाणी राजा मिलिंदा अशोका कळाली
देवदत्त बिंबिसार नमला तो अंगुली
वैभवशाली नगरी वैशाली तिथं आम्रपाली
सुजाता विशाखा चंडालिका बुद्धा शरण आली
धन्य जहाली हर्षद वाणी ~~ २
दिलराज विश्वजिताची
धरली वाणी तथागताची जीवनी मानव हिताची ।। ३ ।।
बुद्धाची ती बुद्ध प्रणाली ~~ २
निनादे शांती समतेची
धरली वाणी तथागताची जीवनी मानव हिताची.
Lyrics By: Dilraj Pawar
Ishtar
Comment