℗ Ishtar Music Pvt. Ltd.

Chandanyachi Chhaya Unplugged (चांदण्याची छाया)
Shirish Pawar & Pravin Done05:12138 BPM2023
Chandanyachi Chhaya Unplugged Marathi Bheemgeet by Anusaya Arts, Sung By Shirish Pawar, Pravin Done Lyrics by Vaman Dada Kardak
Lyrics: Chandanyachi Chhaya Unplugged (चांदण्याची छाया)
चांदण्याची छाया कापराची काया..2.
माऊलीची माया होता माझा भिमराया...3
चांदण्याची छाया कापराची काया..2.
माऊलीची माया होता माझा भिमराया...3.
चोचीतला चारा देत होता सारा..2
आईचा ऊबारा देत होता सारा..2
भिमाई परी चिल्या पिल्यावरी..2
पंख पांघराया होता माझा भिमराया,
माऊलीची माया होता माझा भिमराया..।।1।।
बोलतात सारे विकासाची भाषा..2
लोपली निराशा आता लोपली निराशा..2
सात कोटीमधी विकासाच्या आधी..2
विकासाचा पाया होता माझा भिमराया,
माऊलीची माया होता माझा भिमराया..।।2।।
झाले नवे नेते मलाईची धनी..2
वामनच्या मनी येती जुन्या आठवणी..2
झुंज दिली खरी रामकुंडावरी..2
दगड गोटे खाया होता माझा भिमराया,
माऊलीची माया होता माझा भिमराया..।।3।।
चांदण्याची छाया कापराची काया....
माऊलीची माया होता माझा भिमराया....
Lyrics By: Vaman Dada kardak
℗ Ishtar Music Pvt. Ltd.
Comment