Sumeet Music

Majboot Bhimacha Killa (मजबूत भीमाचा किल्ला)
Arun Yewle & Pravin Yewle05:1293 BPM2023
Tumhi Kitibi Lava Shakti An Kitibi Ladhava Yukti Tumhi Karare Kitibi Halla Lay Majboot Bhimacha Killa marathi bheemgeet song by Yewle Brothers, sung by Arun Yewle & Pravin Yewle
Lyrics: Majboot Bhimacha Killa (मजबूत भीमाचा किल्ला)
तुम्ही किती ही लावा शक्ती
आणि किती ही लडवा युक्ती
तुम्ही करा रे किती ही हल्ला
लय मजबुत भीमाचा किल्ला
तुम्ही किती ही लावा शक्ती
आणि किती ही लडवा युक्ती...2
तुम्ही करा रे किती ही हल्ला
लय मजबुत भीमाचा किल्ला...2
रक्त तीळ तीळ ते आटवून
किल्ला बांधुन ठेवलाय त्यानं
किल्ल्यावरी ते नीळ निशान
फडकवलय माझ्या भीमान
बाबासाहेबांचा विजय असो
बघ भित नाही मांजरीच्या पिल्ला
लय मजबुत भीमाचा किल्ला...II1II
शूर भीमाचा खरा शिपाई
आता दलीत राहिला नाही
किल्ल्यावर जर केली चढाई
घ्याव समजून झालीच लाही
बाबासाहेबांचा विजय असो
करु मनकच तयाचा ढिला
लय मजबुत भीमाचा किल्ला...II2II
करा गनिमी कावा तुम्ही
स्वारी परतूनी लावु आम्ही
जिरवू आम्हीच रे खुमखुमी
नाही आमच्यात कसली कमी
बाबासाहेबांचा विजय असो
नाच तिकडंच चालावा खुल्ला
लय मजबुत भीमाचा किल्ला...II3II
विजयनंदा बेकीची दरी
अशी पडली असली जरी
आप-आपसात भांडती तरी
सेना किल्ल्याच रक्षण करी
बाबासाहेबांचा विजय असो
लावून छातीला जयभीम बिल्ला
लय मजबुत भीमाचा किल्ला...II2II
Lyrics By: Vijayanad Jadhav
Sumeet Music
Comment