Venus

Aale Jagi Bhimraya (आले जगी भीमराया)
Milind Shinde"Aale Jagi Bhimraya" is a powerful and soulful tribute to Dr. Babasaheb Ambedkar, beautifully sung by Milind Shinde, with music composed by Pralhas Shinde and heartfelt lyrics by Tukaram Dhavre. The song celebrates Babasaheb's arrival as a savior of the oppressed, breaking the chains of caste discrimination and spreading the light of knowledge, equality, and Buddhism. With its inspiring words and energetic melody, the song honors his revolutionary spirit and his lifelong mission to uplift the marginalized and establish social justice.
Lyrics: Aale Jagi Bhimraya (आले जगी भीमराया)
आले जगी भीमराया
आले जगी भीमराया
ह्या दीनजना उद्धराया
आले जगी भीमराया ~~ २
पशुतुल्य हीन गणूनी
आम्हा, छळीले शूद्र म्हणुनी
आम्हा, छळीले शूद्र म्हणुनी ~~ २
उठला नरशार्दूल गर्जुनी
तो, उठला नरशार्दूल गर्जुनी
ही जातीयता माराया
आले जगी भीमराया ~~ २ ।। १ ।।
ही जन्मोजन्मीची शिक्षा
तोडण्या धर्मरुढी कक्षा
तोडण्या धर्मरुढी कक्षा ~~ २
दिली बौद्ध धम्माची दीक्षा
ती दिली बौद्ध धम्माची दीक्षा
बीज समतेचं पेराया
आले जगी भीमराया ~~ २ ।। २ ।।
प्रल्हादा...
प्रल्हादा, तो भीमगुणाचा
कैवारी तो ठरला दीनांचा
कैवारी तो ठरला दीनांचा ~~ २
उगविला रवी ज्ञानाचा
तो उगविला रवी ज्ञानाचा
ह्या धरतीला ताराया
आले जगी भीमराया ~~ २
ह्या दीनजना उद्धराया
आले जगी भीमराया ~~ २ ।। ३ ।।
Lyrics by: Tukaram Dhavre
Venus
Comment