Maay Baap Ambedkar Medley (मायबाप आंबेडकर)

Maay Baap Ambedkar Medley (मायबाप आंबेडकर)

"Maay Baap Ambedkar Medley" is a soul-stirring Bheemgeet that powerfully echoes the revolutionary spirit of Dr. Babasaheb Ambedkar. Sung with deep emotion by Shital Sathe, and penned by Shital Sathe and Sachin Mali, this song is a musical tribute to the struggles, sacrifices, and transformative vision of Babasaheb, who dedicated his life to breaking the chains of caste oppression and leading the oppressed toward justice and equality.

The lyrics capture the pain of generations who suffered under social discrimination, their fight for dignity, and Babasaheb’s unwavering mission to empower them. It highlights his call to action—to rise above caste, claim one’s humanity, and build a society based on liberty, equality, and fraternity. Each verse resounds with the determination to eradicate social injustices and embrace Ambedkarite ideals.

With lines like "आल वादळ भीमाच, रणी लढायला शिकवल", the song becomes a battle cry of resistance and empowerment, encouraging listeners to continue Babasaheb’s mission of social transformation and self-respect.

Telecast on Colors Marathi (Jalsa Maharashtra Show), this powerful medley is more than just a song—it's an anthem of liberation, urging people to uphold Babasaheb’s legacy and march toward a truly just society.

Lyrics: Maay Baap Ambedkar Medley (मायबाप आंबेडकर)

मुक्याला बोल देईन
गाण्याला सूर ग
मुक्याला बोल देईन
गाण्याला सूर ग

माई ग माझे माई रमाई आई ग
माई ग माझे माई भिमाई आई ग
भान असू दे गाण मुक्तीच गातोया शाहीर ~~ २
जातीचा मुडदा पाडा सांगतो मायबाप आंबेडकर,
मायबाप आंबेडकर ~~ २
मायबाप आंबेडकर आमचा मायबाप आंबेडकर ।। धृ ।।

आम्ही माणूस कधी व्हाव किती गुलामीत राहावं,
ध्यास जातीच धर्माच किती दीस हे सोसाव,
किती दीस हे सोसाव ~~ २
माणूस म्हणून जन्मलो...ओ..
माणूस म्हणून जन्मलो माणूस म्हणून मी जगणार ~~ २
जातीचा मुडदा पाडा सांगतो मायबाप आंबेडकर,
मायबाप आंबेडकर ~~ २
मायबाप आंबेडकर आमचा मायबाप आंबेडकर... ।। १ ।।

भीम बाबाच्या नावान
कसा बाजार भरला.
झाला घायाळ ग भीम
कुठ चाललीया जत्रा...  बाई ग
ऐका रे...  ऐक राजा
वासरा... भीमाईच्या लेकरा,
आल वादळ भीमाच ~~ २
रणी लढायला शिकावल
आल वादळ भीमाच, रणी लढायला शिकावल ~~ २
आल वादळ भीमाच, रणी लढायला शिकावल ~~ २ ।। २ ।।

गाव कुसाच्या बाहीर सूर्य कोंढला होता जवा
जाळ जातीच ईणून त्यानी डांबला होता थवा
जाळ जातीच ईणून त्यानी डांबला होता थवा ~~ २
या पीढ्यांची लाचारी बंध जातीचे तुटले
गाव कुसाच्या बाहेर वादळ मुक्तीचे ऊठले
गाव कुसाच्या बाहेर वादळ मुक्तीचे ऊठले ~~ २
रोखण्या आत्याचार वाघ बनायला शिकवल,
सत्ता आणायला शिकवल,
आल वादळ भीमाच ~~ २
रणी लढायला शिकावल
आल वादळ भीमाच, रणी लढायला शिकावल ~~ २
आल वादळ भीमाच, रणी लढायला शिकावल ~~ २ ।। ३ ।।

Lyrics By: Shital Sathe and Sachin Mali


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *