T-Series

Ramabai Cha Janma Jhala (रमाबाईचा जन्म झाला)
Anand ShindeRamabai Cha Janma Jhala Waata Sakhar Paan Marathi Bheemgeet by Anand Shinde, Lyrics by Dilraj Pawar, Composed by Harshad Shinde.
Lyrics: Ramabai Cha Janma Jhala (रमाबाईचा जन्म झाला)
अठराशे अठ्ठयानव साल,
हे तिथी हो भाग्यवान....2
रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान....2
रमाबाईचा जन्म झाला
वाटा साखर पान.
भिकु दीप रुख्मिणी हर्षात,
दंग झाले वो बारशात...2
वनंद गाव हे नाचू लागला,
होऊनी बेभान,
रमाबाईचा जन्म झाला
वाटा साखर पान...।।1।।
ही सुकन्या सुखाची रास,
आली हर्षाची घेऊन आस...2
गाव कुसाच्या राहुन बाहेर,
देइ मनाला जान,
रमाबाईचा जन्म झाला
वाटा साखर पान...।।2।।
बारशाला हो जमला गाव, भागीरथी हे ठेवल नाव...2
मानवतेचा गीरवील धडा,
कन्या ही रुपवान,
रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान...।।3।।
लेक संसारी घेईल दुवा, पतीरायाची करील सेवा...2 भविष्यवाणी ज्योतिषाची,
मना देई समाधान,
रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान...।।4।।
अठराशे अठ्ठयानव साल,
हे तिथी हो भाग्यवान....2
रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान....2
रमाबाईचा जन्म झाला
वाटा साखर पान.......
Lyrics by: Dilraj Pawar
T-Series
Comment