Aale Jagi Bhimraya, Are Sagara, Bhimrayavani Pudhari Hoil Ka?, Dandashi Dand Bhidtana, Jari Jhala Barister, Majhya Jatich Jatich, Nilya Nishana Khali, Saha December Dusht Kalane, Samaaj Viknaar Nahi, Soniyachi Ugavali Sakaal

Majhya Jatich Jatich (माझ्या जातीचं जातीचं)

"Majhya Jatich Jatich" is a powerful and emotional tribute sung by Anand Shinde, composed by Pralhad Shinde, and written by Rajesh Jadhav. The song proudly celebrates the greatness of Dr. Babasaheb Ambedkar, describing him as the purest gold ("शंभर नंबरी सोनं") of Mhow's soil. It highlights how Babasaheb, through his wisdom and courage, eradicated caste-based discrimination, uplifted the oppressed, and gave strength to the marginalized communities. With deep pride in their identity and heritage, the lyrics emphasize the transformation brought by Babasaheb’s leadership, his groundbreaking work on the Indian Constitution, and his lasting impact on humanity. The song is a vibrant anthem of honor, unity, and gratitude towards Babasaheb’s revolutionary legacy.

Lyrics: Majhya Jatich Jatich (माझ्या जातीचं जातीचं)

माझ्या जातीचं जातीचं थोर नशीब जातीचं  ~~ २
भीम शंभर नंबरी सोनं महूच्या मातीच ~~ २
भीम शंभर नंबरी सोनं महूच्या मातीच ~~ २ ।। धृ  ।।

आठवता इतिहास, देही ग्वाहीचं बोलकी
देही ग्वाहीचं बोलकी नाही हालकी फुलकी
आम्ही मानसं माणसं, जणू सोनिया सारखी
जणू सोनिया सारखी माणुसकीलाच पारखी
दुःखी रडान गावकी, गावकी न म्हारकी
गावकी न म्हारकी होती आमुची मालकी
पिढ्या पिढ्याच दुखणं नव्हतं ऐकल्या रतीच
नव्हतं ऐकल्या रतीच जाती रोगाच्या साथीच
भीम शंभर नंबरी सोनं महूच्या मातीच ~~ २ ।। १ ।।

एका भयान रातीला, ग्वाड सपान पडलं
ग्वाड सपान पडलं मन त्यातच गढलं
काळ निजेला सारून, जवा डोळ उघाडलं  
जवा डोळ उघाडलं देव दर्शन घडलं
मानवतेच्या भीमदूता, भीतीनं भूतली धाडलं
जातीयतेच्या भुताला त्यानं मातीत गाडलं
तळागाळाच्या माणसा तुला वरती काढलं
तुला वरती काढलं तुझं वाजाणं वाढलं
सुख दीनदुबळ्याचं होत भीमाच्या हातीच
भीममुळं ह्या जातील बळ आलंया हत्तीचं  
भीम शंभर नंबरी सोनं महूच्या मातीच ~~ २ ।। २ ।।

भीम रस तो लवाचा, भीम कडाडती इज
सनातन्याची भीमानं केली हरामचं निज
मोठ्या मनानं राखाया हिंदू धर्माची ती गुज
लिवलं हिंदू कोड बिल नाही झालं त्याच चीज
भीम बॉम हायड्रोजन धुमधडाड आवाज
धुमधडाड आवाज गाज सभा गोलमेज
गाणं भीमाच्या कीर्तीचा सार जण हे गातीच
सार जण हे गातीच कोट करून छातीचं
भीम शंभर नंबरी सोनं महूच्या मातीच ~~ २ ।। ३ ।।

भीम कोकणाची शान, भीम दक्खनाचा कणा
सांगे राजेश या जना छाती ठोकून पुन्हा पुन्हा
ह्या देशाचा इतिहास भीमा विना सुना सुना
देशी परदेशी पाहुणा देई भीमाला वंदना
बापू जाता तराजूत भीम भारीच विद्वाना
लिहून देशाची घटना दिला लोकशाहीचा दागिना
अरे काळ्या कालपात्या तुझ्या वाटोळं नीतीच
भीमासाठी तुझी कारं अशी बुद्धी हि सोतीच
भीम शंभर नंबरी सोनं महूच्या मातीच ~~ २
माझ्या जातीचं जातीचं थोर नशीब जातीचं  ~~ २
भीम शंभर नंबरी सोनं महूच्या मातीच ~~ २
भीम शंभर नंबरी सोनं महूच्या मातीच ~~ २ ।। ४  ।।

Lyrics by: Rajesh Jadhav


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *