℗ Ishtar Music Pvt. Ltd.

Bhag Ujalale (भाग उजाळल)
Anand Shinde07:49138 BPM2023
Bhag Ujalale Daina Oshalala Marathi Bheemgeet by Milind Shinde Lyrics by Rajas Jadhav
Lyrics: Bhag Ujalale (भाग उजाळल)
भाग उजाळल दैन ओशाळल
भाग उजाळल दैन ओशाळल
हीन दिन हे बघून भीमान
तन मन जाळल...2
काळ्या भोर त्या काळोखात,
व्हत भविष्य काळ भोर,
फुलवील लखलखाट,
खोल गेलेल्या नेतरा म्होरं,
फाटल आभाळ त्यान पिघाळला
हीन दिन हे बघून भीमान
तन मन जाळल...2
भाग उजाळल दैन ओशाळल...।।1।।
खाता जातीच्या साठी माती,
नाही दगुड तो वगाळला,
दिस दावा या सोनीयाचा,
उभा जन्म ह्ये उगाळल...2
जन्मल्या जातीच ऋण जपाळल...2
हीन दिन हे बघून भीमान
तन मन जाळल...2
भाग उजाळल दैन ओशाळल...।।2।।
सुपाएवढाल काळीज,
दिल देणारन त्या पाशी,
जाती भावंड राहता उपाशी,
भीम जेवला नाही तुपाशी...2
घास अमृताचा घ्यायच टाळल...2
हीन दिन हे बघून भीमान
तन मन जाळल...2
भाग उजाळल दैन ओशाळल...।।3।।
सोन्या परा तो माणसाच्या,
झाल माथेर त्या जलमाचं,
उभा जलम वज वाहुन,
अन्यायाव जोर जुलूमाच...2
काट वेचूनिया सुख ते माळल ...2,
हीन दिन हे बघून भीमान
तन मन जाळल...2
भाग उजाळल दैन ओशाळल...।।4।।
आल्या पिढ्या गेल्या राजसा
भिमाच्या ग जल्मा पासुर
कुण्या माऊलीचा त्यो पुत
नाही जनमला च्यातूर...2
माया मायंदाळ लावून सांभाळल...2
हीन दिन हे बघून भीमान
तन मन जाळल...2
भाग उजाळल दैन ओशाळल...।।5।।
भाग उजाळल दैन ओशाळल......
हीन दिन हे बघून भीमान
तन मन जाळल...
Lyrics By: Rajas Jadhav
℗ Ishtar Music Pvt. Ltd.
Comment