
Bharatacha Ghatanakar (भारताचा घटनाकार)
Vaibhav KhuneBharatacha Ghatanakar Marathi Bheemgeet by Vaibhav Khune, Composed by Milind Mohite
Lyrics: Bharatacha Ghatanakar (भारताचा घटनाकार)
भिमाईचा तो बाळ भीमराया,
बहुजनांचीया आई,
लिहूनीया देशाची घटना,
अहो केली जगी नवलाई....
जिद्द शिक्षणाची उरी,
होती गरीबी ती घरी,
मन लावून शिकला तरी,
नाही चुकला शाळेत जाया,
भारताचा घटनाकार झाला माझा भिमराया...2
सुभेदार रामजीच पोर,
भलताच बुध्दीन हुशार...2
जरी होता वर्गाच्या बाहेर,
धडा धडा द्यायचा उत्तर...2
त्या कपटी मास्तरान,
हाती ?? पोर म्हाराच माणुन बंदी घातलीय तया
या भारताचा घटनाकार झाला माझा भिमराया...।।1।।
भीमान आम्हाला घडविल,
जिवन सोन्यान मडविल...2
गुलामी मधुन सोडविल,
काळ म्हणून रडविल...2
तवा दिव्याखाली बसून,
केला आभ्यास कसुन,
हाती दातान पुसून हिंदुस्थानला ताराया
भारताचा घटनाकार झाला माझा भिमराया...।।2।।
भिम बहुजनाचा पिता,
लाखात भिमराव होता...2
त्यालाच लेकरांची चिंता, सोडविला जातीचा गुंता...2
त्या राजश्री बंधुंना आणि शाहीर नंदुन दिल बुध्दांशी वंदून लागे धम्मगीत गाया
भारताचा घटनाकार झाला माझा भिमराया...।।3।।
जिद्द शिक्षणाची उरी,
होती गरीबी ती घरी,
मन लावून शिकला तरी,
नाही चुकला शाळेत जाया,
भारताचा घटनाकार...झाला माझा भिमराया.........
Comment